Tuesday, February 1, 2011

तु सोडून गेल्यावर..

"उमजत  होते तुला सर्व
का नाही तेव्हांच थांबवले?
कळी माझी फुलण्या आधीच,
फुल का नाही तोडले?

स्वप्नात तुझ्या मी रमले,

का नाही मला जागवले?
प्रेम मला होण्या आधीच,
का नाही तु थांबवले?

सोडूनच जायचे होते तुला,

तर का मला रुतावले?
माझी व्यथा तुला काय समजणार,
का कारण बनवून भुलवले?

दु:ख मी नाही करत,

मी ही आता सावरले आहे...
तुझ्या विना मी आता,
जगायचे कसे ते शिकले आहे...

तु सोडून गेला तरी,

मला दुसऱ्याने जवळ केले...
न सोडून जायचे मला,
तुझ्याच आठवणीने वचन
दिले...

कोमेझ्लेल्या माझ्या फुलाला

तोच टवटवीत ठेवणार आहे...
तोच प्रत्येक सुंदर क्षण मला,
तो पुन्हा दाखवणार आहे..."


2 comments: