Wednesday, September 28, 2011

मनातला कोपरा


शांततेत एकदा बसले होते
दमून रोजच्या कामातून 
अगणित विचार डोक्यात चालू...

हळूच कुठेतरी दडपण वाटलं
बेचैन झाले हृदयाचे ठोके
काही कळेना काय होतंय ...

मग घुटमळताना मनात मात्र 
ह्याच्याकडे लक्ष गेले ...

अलगद दार उघडून मग,
दबक्या पावलाने मनात गेले 
धुळीच्या चादरीखाली कित्येक ,
झोपल्या होत्या आठवणी...

भीती वाटली .... झोप मोडली तर?
सारखा त्रास कशाला देतेस... हे म्हणून चिडल्या तर?

कधी तरी विचारवं , लागलाय का रे खूप मना?
ओझं उचलून एवढं ...  थकला आहेस का रे तू?


परत असा करणार नाही , त्रास तुला देणार नाही.

मग हलकेच त्या आठवणींना उचलावा...
मनाच्या कोनाड्यातून बाहेर ठेवावं...